Navnath Ban : बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचेही राहुल गांधी यांना नाही भान; उबाठा गटाला पाच रोखठोक सवाल, बन यांची पोस्ट चर्चेत
Navnath Ban : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून साधी आदरांजलीही वाहिली नाही, असा मुद्दा उपस्थित करत नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Navnath Ban : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी राज्यभरातून त्यांना अभिवादन करण्यात आले. उद्धव ठाकरे गटासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
राजकीय नेत्यांसह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, याचदरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. ( Navnath Ban)
नवनाथ बन यांचे ठाकरेंना पाच रोखठोक सवाल (Navnath Ban)
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून साधी आदरांजलीही वाहिली नाही, असा मुद्दा उपस्थित करत नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला राहुल गांधी यांनी साधी आदरांजलीही वाहिली नाही, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. मात्र, ज्यांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेची ओळख उभी राहिली, त्याच वंदनीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारी उबाठा आता नेमकी कोणती भूमिका घेणार आहे?
राहुल गांधींच्या प्रत्येक अजेंड्यावर माना डोलावणारे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण आता का होत नाही? राहुल गांधींच्या राजकीय दरबारात निष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडायचे आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा विषय आला की मौन बाळगायचं, हा कसला स्वाभिमान?
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्वप्ने पाहताना बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान मात्र विसरायचा हेच यांचं धोरण आहे. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे की, त्यांच्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत की काँग्रेसची गुलामी? स्वार्थासाठी विचारांची तडजोड आणि निष्ठेची विक्री, हाच उबाठा गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का?
@OfficeofUT @ShivSenaUBT_ @AUThackeray @rautsanjay61
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) November 18, 2026
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर आणि भूमिकेवर शिवसेनेची ओळख निर्माण झाली. मात्र, आता त्यांचा वारसा सांगणारा उद्धव ठाकरे गट नेमकी कोणती भूमिका घेणार आहे? राहुल गांधी यांच्या प्रत्येक राजकीय अजेंड्याला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.
‘बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे की काँग्रेसची गुलामी?’ (Navnath Ban)
Navnath Ban : बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचेही राहुल गांधी यांना नाही भान; उबाठा गटाला पाच रोखठोक सवाल, बन यांची पोस्ट चर्चेत
नवनाथ बन यांनी पुढे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्वप्ने पाहताना बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान विसरला जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच राहुल गांधी यांच्या राजकीय वर्तुळात आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विषय आला की मौन बाळगायचे, हा कसला स्वाभिमान आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
उबाठाचा नवा राजकीय अजेंडा काय? ( Navnath Ban)
स्वार्थासाठी विचारांशी तडजोड केली जात आहे का? निष्ठेची विक्री हाच उद्धव ठाकरे गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का? असा सवाल करत नवनाथ बन यांनी ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.
बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका महत्त्वाची की काँग्रेससोबतची राजकीय आघाडी, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Indrayani River : दशक उलटले, पुनर्बांधणी रखडली; इंद्रायणी घाटाची दुरवस्था कायम





