राहुल गांधी रात्री उशिरा दिल्ली एम्समध्ये दाखल ; थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांची घेतली भेट

Rahul Gandhi in AIIMS । लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भेट दिली. काँग्रेस नेत्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. या भेटीनंतर, काँग्रेस नेत्याने केंद्र आणि दिल्ली सरकारवर रुग्णांप्रती ‘असंवेदनशीलता’ दाखवल्याचा आरोप केला.
राहुल गांधींच्या या भेटीचे फोटो काँग्रेसच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. फोटोसोबत लिहिले होते की, ‘दुरू दूरवरून उपचारासाठी आलेल्या लोकांना येथील रस्ते, पदपथ आणि भुयारी मार्गांवर झोपावे लागत आहे. मोदी सरकार आणि दिल्ली सरकारने त्यांना अशा बिकट अवस्थेत सोडले आहे. दोन्ही सरकारने त्यांच्या जबाबदारीकडे पाठ फिरवली आहे.
नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने दिल्ली AIIMS के बाहर मरीजों और उनके परिवार से मुलाकात की।
दूर-दराज से इलाज के लिए आए लोग यहां सड़कों, फुटपाथ और सबवे पर सोने को मजबूर हैं।
मोदी सरकार और दिल्ली की सरकार ने इन्हें अपने हाल पर छोड़ रखा है। अपनी जिम्मेदारी से मुंह मोड़ रखा है। pic.twitter.com/YsGPq0t57y
— Congress (@INCIndia) January 16, 2025
हे आज दिल्ली एम्सचे वास्तव Rahul Gandhi in AIIMS ।
काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पुढे लिहिले की, ‘उपचारांसाठी महिनोनमहिने वाट पाहणे, सरकारची गैरसोय आणि असंवेदनशीलता – हे आज दिल्ली एम्सचे वास्तव आहे. परिस्थिती अशी आहे की, आपल्या प्रियजनांच्या आजाराचे ओझे वाहून दूरदूरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना या कडाक्याच्या थंडीत फूटपाथ आणि सबवेवर झोपावे लागत आहे.
सरकार जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी Rahul Gandhi in AIIMS ।
राहुल गांधी यांनी एका सोशल मीडियावर हिंदीमध्ये पोस्ट करत, ‘आज मी एम्सच्या बाहेर असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, जे उपचारांच्या शोधात दूरदूरहून आले आहेत. उपचारासाठी जाताना त्यांना रस्त्यावर, पदपथांवर आणि भुयारी मार्गांवर झोपावे लागते. थंड जमीन, भूक आणि अस्वस्थतेमध्ये, रुग्णांनी आशेची ज्योत तेवत ठेवली आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार दोन्हीही जनतेप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.” असे म्हणत केंद्र आणि दिल्लीत सरकारवर त्यांनी आरोप केला आहे.





