Rahul Gandhi : “जनतेचा पैसा लुटून…’; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा, ट्विट चर्चेत !

Rahul Gandhi | Vinod Tawde । Narendra Modi : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यावर आता थेट काँग्रेस नेते राहुल गांधींनी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं की, “मोदीजी, हे 5 कोटी कोणाच्या तिजोरीतून काढले आहेत? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला कोणी टेम्पोतून पाठवला?’ असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे.
मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा? https://t.co/Dl1CzndVvl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2024
नेमकं काय घडले होतं?
भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे हॉटेल विवांतमध्ये पैसे वाटत असल्याची माहिती समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्यावेळी भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली.
हितेंद्र ठाकुरांनी केला मोठा गौप्यस्फोट :
बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यादरम्यान मोठा गौप्यस्फोट केला. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.





