राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत गोदाबाईंचा व्हिडिओ ; मतं कशी डिलीट केली जातात सगळं दाखवलं

Rahul Gandhi। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदत घेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवात करताना, “सर्वप्रथम, हा हायड्रोजन बॉम्ब नाही. हायड्रोजन बॉम्ब येत आहे. देशातील तरुणांना निवडणुकीत कसा गोंधळ घातला जात आहे हे दाखवून देण्यासाठी हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.” असे म्हटले.
पुढे राहुल गांधी यांनी, “मी माझा मुद्दा ठोस पुराव्यांसह मांडत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की मते कशी बदलली गेली.” राहुल यांनी दावा केला की कर्नाटकातील अलांडमध्ये बनावट लॉगिन वापरून ६,००० हून अधिक मते वगळण्यात आली. त्यांच्या सादरीकरणादरम्यान, त्यांनी मत चोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले. ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती त्यांनाही त्यांनी संबोधित केले. त्यापैकी एक गोदाबाई होती. Rahul Gandhi।
राहुल यांनी स्पष्ट केले की मते वगळण्याचे हे प्रयत्न काँग्रेस पक्ष जिंकत असलेल्या बूथवर करण्यात आले होते. त्यांनी गोदाबाई नावाच्या महिलेचे उदाहरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “कोणीतरी गोदाबाईच्या नावाने बनावट लॉगिन तयार केले आणि १२ मते वगळण्याचा प्रयत्न केला आणि गोदाबाईंना याची माहिती नव्हती.”
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “Aland is a constituency in Karnataka. Somebody tried to delete 6018 votes. We don’t know the total number of votes that were deleted in Aland in the 2023 election. They are much higher than 6,018, but somebody got… pic.twitter.com/yjcBdjPbm4
— ANI (@ANI) September 18, 2025
राहुल म्हणाले यांनी,”कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारसंघात कोणीतरी ६,०१८ मते वगळण्याचा प्रयत्न केला. २०२३ च्या निवडणुकीत एकूण किती मते वगळण्यात आली हे आम्हाला माहिती नाही. ती संख्या ६,०२८ पेक्षा जास्त आहे, पण योगायोगाने ही ६,०१८ मते वगळताना कोणीतरी पकडले गेले” असा आरोप त्यांनी केला.
पुढे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, एका बूथ-स्तरीय अधिकाऱ्याला एका महिलेच्या काकाचे मत वगळण्यात आल्याचे कळले. त्यांनी त्यांच्या काकाचे मत कोणी वगळले आहे हे शोधण्यासाठी चौकशी केली. त्यांना आढळले की त्यांच्या शेजाऱ्याने त्यांचे मत वगळले आहे. जेव्हा त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी कोणतेही मत वगळले नाही. याचा अर्थ मत वगळणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्याचे मत वगळण्यात येत होते त्याला याबद्दल माहिती नव्हती. याचा अर्थ असा की दुसऱ्या कोणीतरी संपूर्ण प्रक्रिया हायजॅक केली आणि मते वगळली. Rahul Gandhi।
राहुल यांनी दावा केला की, “काँग्रेस मतदारांना लक्ष्य करण्यात आले. दलित आणि ओबीसी हे लक्ष्य होते. मतदार यादीतून लक्ष्यित मतदारांची नावे वगळण्यात आली. काँग्रेसच्या संभाव्यतेला कमकुवत करण्यासाठी मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळण्यात आली.” मत चोरीबाबत राहुल गांधींची ही दुसरी पत्रकार परिषद आहे. ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी निवडणूक आयोगावर भाजपशी मिलीभगत करून मते चोरण्याचा आरोप केला होता.





