Rahul Dravid Resigns : द्रविडने स्वतःहून पद सोडलं की हटवलं…! डिव्हिलियर्सने ‘RR’च्या निर्णयावर उपस्थित केला सवाल

मालक किंवा व्यवस्थापनाचा निर्णय –
एबी डिव्हिलियर्सने आपल्या ‘360 लाइव्ह’ या सोशल मीडिया शोमध्ये म्हटले, “मला वाटतंय, हा मालक किंवा व्यवस्थापनाचा निर्णय होता. त्यांनी द्रविडला फ्रँचायझीमध्ये मोठी भूमिका देऊ केली, परंतु त्याने ती नाकारली. कदाचित तो नाराज असेल, कारण त्याला अजूनही डगआउटमध्ये राहायचे होते. हा त्याचा निर्णय होता की नाही, मला माहीत नाही. भविष्यात त्याच्याशी बोललो तर खरे कारण कळेल, पण द्रविडने मोठी पोकळी निर्माण केली आहे.”
राजस्थानचा मागील हंगाम राहिला होता निराशाजनक –
एबी डिव्हिलियर्सने यासंदर्भात सांगितले की, राजस्थानचा हा निर्णय फुटबॉल क्लबच्या धर्तीवरील आहे, जिथे प्रशिक्षक अपेक्षेनुसार कामगिरी न केल्यास व्यवस्थापन अचानक निर्णय घेते. 2008 च्या आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्सने गेल्या सप्टेंबरमध्ये द्रविडला संघात आणून आपला दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न केला होता. द्रविडने भारतीय संघाला टी-20 विश्वचषक जिंकवला होता, परंतु राजस्थान रॉयल्स संघ गेल्या हंगामात 14 सामन्यांत केवळ चार विजय मिळवून नवव्या स्थानावर राहिला.
हेही वाचा – Harbhajan Singh : ‘तो व्हिडीओ लीक करणे चुकीचे…’, हरभजन सिंग ललित मोदीवर संतापला, नेमकं प्रकरण काय?
फ्रँचायझीने निवेदनात काय म्हटले होते?
द्रविडच्या राजीनाम्यानंतर राजस्थान रॉयल्सने निवेदनात म्हटले होते की, “राहुल द्रविड अनेक वर्षे रॉयल्सच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या पिढीवर प्रभाव टाकला, संघात मजबूत मूल्ये रुजवली आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर अमिट छाप सोडली. फ्रँचायझीच्या संरचनेच्या पुनरावलोकनाअंतर्गत त्यांनी मोठी भूमिका देऊ केली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. राजस्थान रॉयल्स, त्याचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुल यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे आभारी आहेत.”





