राघव चड्डा-परिणिती चोप्रा ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात; गुरुग्राममध्ये होणार रिसेप्शन

नवी दिल्ली – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि “आप’ खासदार राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, परिणीती-राघव 25 सप्टेंबरला राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत.
यादरम्यान त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार आहेत. परिणीतीच्या टीमनेही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्नानंतर हे जोडपे गुरुग्राममध्ये रिसेप्शनही देणार असल्याचे बोलले जात आहे.
जूनमध्ये आलेल्या मीडिया रिपोर्टसनुसार, परिणीती-राघव उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलास 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न करणार होते. अलीकडेच, सोशल मीडियावर राघवसोबतचा एक फोटो शेअर करताना परिणीतीने,
“आम्ही फक्त एकदाच नाश्ता केला होता आणि मला समजले की तो माझ्यासाठी योग्य आहे. माझ्या आयुष्यात आलेली ती सर्वात सुंदर, शांत आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे. मला त्यांचा सहवास, पाठिंबा, मैत्री आणि समजूतदारपणा आवडला,’ असे म्हटले होते.





