Raghav chadhdha : “देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे…”; राघव चढ्ढांच्या भाजप प्रवेशावरुन आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया
Raghav Chadha Joins BJP : राघव चढ्ढा यांच्यासह 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Raghav chadhdha : ‘आम आदमी पार्टी’चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
एका पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना चड्ढा यांनी पक्ष आपल्या मूळ मूल्यांपासून पूर्णपणे भरकटल्याचा गंभीर आरोप केला.
गेल्या काही दिवसांपासून दूर होताना दिसत असलेले खासदार राघव चढ्ढा हे भाजपच्या जवळ गेले आहेत. राघव चढ्ढा यांच्यासह 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विशेष म्हणजे, तत्पूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेत आपण आदमी पक्ष सोडत असून राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे भाजपात विलिगीकरण करत असल्याचेही त्यांनी म्हटलं. आप पक्षातील या फुटीवर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
आण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?
आप पक्षातील फुटीसंदर्भात अण्णा हजारे यांनी म्हणाले की, “आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता पक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही जाणार नाही.
आज समाज आणि देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे लागत आहेत. त्यामुळे आता लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. हे जे चाललं आहे ते स्वार्थसाठी चाललं आहे.”
पुढे ते म्हणाले, ” सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता, आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही. पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैसा यांच्या लालचमध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर होते. त्यामुळे, मनमर्जीप्रमाणे सत्ताबदलाचे काम होतात हे बरोबर नाही.”
भाजपमध्ये सामील होणाऱ्या ७ जणांची नावे
राघव चड्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर सात जणांची नावे सांगितली. राघव चढ्ढा यांच्यासह संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, हरभजन सिंगया आणि अशोक मित्तल यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली आहे.
अलीकडेच, आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. त्यांच्यावर १० दिवसांपूर्वी ईडीकडून छापेमारीत करण्यात आली होती आणि आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे.
हेही वाचा:
PMC News : पुणेकरांनो तहानलेलेच राहणार? महापालिकेने मुख्यसभेतच दिली ‘ही’ धक्कादायक कबुली






