एका हातात शॅम्पेन, दुसऱ्या हातात ब्रेस्ट पंप; राधिका आपटेचा ‘हा’ फोटो पाहून नेटकरी भडकले

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या अभियनाद्वारे चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. राधिकाने गेल्यावर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच आता राधिका काम करताना दिसत आहे. आईपण आणि काम संभाळताना राधिकाला दोन्ही स्तरांवर कसरत करावी लागत आहे.
नुकतेच राधिकाने ‘बाफ्टा’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. तेथून तिने पडद्यामागचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राधिका तिच्या मुलीसाठी ब्रेस्ट मिल्क काढताना दिसत आहे. काम करताना आईसमोर असलेले आव्हान तिने या फोटोत दाखवले आहे. मात्र, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
राधिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती वॉशरुममध्ये उभी असलेली दिसत आहे. तिच्या एका हातात ब्रेस्ट मिल्क पंपिंग मशीन आणि तर दुसऱ्या हातात शॅम्पेन आहे. राधिकाने हा फोटो शेअर करत लिहिले की, बाफ्टामधलं माझं वास्तव. मला नताशाचे आभार मानायला हवेत की तिच्यामुळे मला बाफ्टा सोहळ्याला उपस्थित राहता आले. माझ्या ब्रेस्टपंपच्या वेळेनुसारच तिने माझे शेड्युल ठरवले. ती माझ्यासोबत वॉशरुममध्ये तर आलीच पण सोबत शॅम्पेनही घेऊन आली.
नुकतंच आई होणे आणि काम सांभाळणे हे खरचं कठीण आहे. फिल्म इंडस्ट्रीत अशा प्रकारे काळजी आणि संवेदनशीलता खरचं कमी दिसते. हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे, असेही तिने म्हटले आहे. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ब्रेस्टपंपच्या वेळी राधिका शॅम्पेन पित असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, अल्कोहॉल बाळासाठीही धोकादायक ठरू शकते, अशी चिंताही काही जणांनी व्यक्त केली.





