Radhika Apte : ‘राधिका आपटे’च्या मॅटर्निटी फोटोशूटची सोशलवर चर्चा; हटके फॅशनने वेधलं लक्ष !

Updated On:
Photo 1

Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने मराठीसह बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एका तान्ह्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लॅपटॉपवर काम करत बाळाला ब्रेस्टफीडिंगही करत असल्याचं दिसून आलं. या गोड फोटोसोबत राधिकाने ‘बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग,’ असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. तिचे हे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

दरम्यान, आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच आई झालेल्या राधिका आपटेने आता मॅटर्निटी फोटोशूटच्या काही खास क्षणांना शेअर केले आहे. या फोटोंमध्ये राधिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

फोटोशूटबद्दल राधिका म्हणाली, “बाळाला जन्म देण्याआधी मी हे फोटोशूट केले होते. त्या वेळी मी माझ्या दिसण्याबद्दल खूप चिंतेत होते. इतक्या वजनात मी स्वतःला कधीच पाहिले नव्हते. माझे शरीर सुजले होते, खूप वेदना होत्या आणि झोपही पूर्ण होत नव्हती. आता आई होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि माझे शरीर पुन्हा बदलायला लागले आहे.” असं ती म्हणाली.

“आता मी या फोटोंकडे प्रेमाने पाहते, आणि त्याकाळी स्वतःवर एवढं कठोर झाल्याबद्दल वाईट वाटते. आता मला या बदलांमध्ये सौंदर्य दिसते, आणि हे फोटो मी नेहमी जपून ठेवणार आहे.” असं देखील राधिका म्हणाली आहे.

मात्र, या फोटोंवरून काही लोकांनी तिला ट्रोल केले देखील केलं आहे. सध्या राधिका आपटे मातृत्वाच्या प्रवासाचा आनंद घेत आहे. राधिकाला या ड्रेसेस आणि फोटोशूटमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. मॅटर्निटी फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिचे 3 लूक दिसले आहेत.

पहिल्या फोटोत तिने नेट ड्रेस परिधान करून फोटो काढताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राधिका हॉट ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. शेवटच्या लूकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीला पांढऱ्या पोशाखात पाहिले जाऊ शकते, ड्रेसमध्ये बेबी बंप भागात कट आहे आणि अभिनेत्री ती फ्लाँट करत आहे.

दरम्यान, राधिका तिचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवते. राधिकाने तिच्या लग्नाची माहितीही बराच काळ लपवून ठेवली होती. तिने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 12 वर्षानंतर आई होणार असल्याची माहितीही तिने सांगितली नव्हती.

आणखी संबंधित बातम्या

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम