Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं…; ‘भूतम् भयम्’ चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?
Bhutam Bhayam : 'भूतम् भयम्' सिनेमा २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार

Bhutam Bhayam : ‘भूतम् भयम्’ या हॉरर सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरने आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘भूतम् भयम्’च्या नव्या पोस्टरवर अभिनेत्रीचा भयावह लूक दिसत आहे. केसांच्या जटा, गळ्यात कवड्यांच्या माळा, वाढलेली नखं अशा लूकमध्ये सिनेमातील जठाई दिसत आहे. पण, यातील अभिनेत्रीला ओळखणे देखील कठीण आहे. (Bhutam Bhayam)
View this post on Instagram
या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत ही राखी सावंत असल्याचं म्हटलं आहे. परंतु, ही राखी सावंत नाही तर अभिनेत्री छाया कदम आहे. त्यांचा ‘भूतम् भयम्’ सिनेमातील हा लूक पाहून सगळेच थक्क झाले आहेत. (Bhutam Bhayam)
दरम्यान, या सिनेमात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांची धमाल टीम पाहायला मिळणार आहे.
‘भूतम् भयम्’ सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन रामचंद्र गावकरने यांनी केले असून, येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीचा खतरनाक लुक पाहून अनेकांची चित्रपटाची उत्सुकता देखील अधिक वाढली आहे. Bhutam Bhayam
हेही वाचा:
Tanmay Vekaria : “बाघा भूमिकेमुळे आता सरळ उभे राहणेही अवघड”; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्याचा खुलासा





