राधिका आपटे होणार आई; रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेने गुड न्यूज दिली आहे. लवकरच ती आई होणार आहे. नुकतेच तिने तिच्या ‘सिस्टर मिडनाईट’ या नवीन चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दाखवला आहे, ज्यामुळे ती खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच सर्वांना आश्चर्यचकित केले. राधिकाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
राधिकाच्या आगामी ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाचं युकेमध्ये प्रीमिअर पार पडलं. यावेळी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. राधिकाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलियनिस्ट आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. नॉर्थन इंग्लंडमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हे लग्न केलं होतं. त्यानंतर आता लग्नाच्या 12 वर्षांनंतर हे जोडपे आई-बाबा होणार आहेत. गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी अभिनेत्री राधिका आपटेने ‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024’मधील फोटो पोस्ट करत प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं आहे.
राधिका आपटे पहिल्यांदाच तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली आहे. यापूर्वी तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर केली नव्हती. त्यामुळे तिने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले.
दरम्यान, राधिका तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवते. सोशल मीडियावरही ती सक्रिय नसते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, राधिकाचे ‘सिस्टर मिडनाईट’ आणि ‘लास्ट डेज’ हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे.
हेही वाचा :
“चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला…”; दिव्या खोसलाने करण जोहरला सुनावले





