Radhamohan Mishra Case: भक्तांकडून लिहून घ्यायचा ‘मनाचा रिपोर्ट’ अन् करायचा ब्लॅकमेल; भोंदूबाबाचा भयंकर पराक्रम उघड

Radhamohan Mishra Case: राधामोहन मिश्रासह स्वामी कंवल नयन आणि ६ महिला आरोपींना अटक; आश्रमातील जप्त डिजिटल पुराव्यांतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता.

Updated On:
Radhamohan Mishra Case: भक्तांकडून लिहून घ्यायचा ‘मनाचा रिपोर्ट’ अन् करायचा ब्लॅकमेल; भोंदूबाबाचा भयंकर पराक्रम उघड

Radhamohan Mishra Case – ईश्वराचा अवतार असल्याचा दावा करून भक्तांना फसवणारा राधामोहन मिश्रा हा आपल्या अनुयायांकडून नियमितपणे मनाचा रिपोर्ट लिहून घेत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये भक्तांना आपल्या मनातील विचार, चुका, वैयक्तिक आयुष्य, कुटुंबातील घडामोडी आणि गुपिते लिहून द्यायला लावत असे. त्यामध्ये काहीही लपवले किंवा खोटे लिहिले, तर नरकात जाल, अशी भीती मिश्रा दाखवत असल्याने अनेक भक्त पूर्णपणे शरणागत झाले होते.

पोलिसांच्या तपासानुसार, मिश्रा या मनाच्या रिपोर्टमधील वैयक्तिक माहिती भक्तांना धमकावण्यासाठी वापरत होता. आश्रमात राहणाऱ्या मुलांचे किंवा भक्तांचे रिपोर्ट त्यांच्या पालकांना दाखविण्याची धमकी देऊन तो त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करत असे. पीडित तरुणीबाबतही त्याने हाच डाव रचला. तरुणीने कुटुंबीयांना अत्याचाराची माहिती देण्याचा प्रयत्न केल्यानंतर, तिच्या मनाच्या रिपोर्टमधील काही वैयक्तिक बाबी कुटुंबीयांसमोर मांडून तिचीच बदनामी केली. त्यामुळे कुटुंबीयांचाही तिच्यावरील विश्वास कमी झाला.

Radhamohan Mishra Case:

Radhamohan Mishra Case: भक्तांकडून लिहून घ्यायचा ‘मनाचा रिपोर्ट’ अन् करायचा ब्लॅकमेल; भोंदूबाबाचा भयंकर पराक्रम उघड

त्याचाच फायदा घेत मिश्रा अनेक वर्षे तिचे लैंगिक, मानसिक व शारीरिक शोषण करत होता. सध्या मिश्रा हा खराडी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यासह स्वामी कंवल नयन आणि सहा महिला आरोपींना अटक केली आहे. आश्रमातून जप्त केलेले लॅपटॉप, मोबाइल, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क पासवर्डने सुरक्षित असल्याने त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, त्यातून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  (Radhamohan Mishra Case)

तरुणीकडून वडिलांच्या घरातच चोरी   (Radhamohan Mishra Case)

मिश्राने पीडित तरुणीला तिच्याच वडिलांच्या खोलीतील कपाटातून पैसे व महत्त्वाची कागदपत्रे चोरून आणण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच कागदपत्रांचा वापर करून तरुणीच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : ग्राहकांचे ‘बुकिंग’ करून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई

2026-09-17 17:11:37

Pune News : ग्राहकांचे ‘बुकिंग’ करून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई

Pune News : ४० हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोंटींची फसवणूक; न्यायालयाने फेटाळला जामीन

2026-09-12 18:01:04

Pune News : ४० हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोंटींची फसवणूक; न्यायालयाने फेटाळला जामीन

Pune News : पुणे पोलिस दलात खळबळ! रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला हजेरी; ३ कर्मचारी निलंबित

2026-09-12 17:28:34

Pune News : पुणे पोलिस दलात खळबळ! रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला हजेरी; ३ कर्मचारी निलंबित

Pune News : विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; १० लाखांच्या १४ दुचाकी जप्त

2026-09-12 15:24:36

Pune News : विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; १० लाखांच्या १४ दुचाकी जप्त

Fake Doctor: पदवी नसताना चालवायचे क्लिनिक; खराडी अन् वारजेत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड

2026-09-12 06:15:10

Fake Doctor: पदवी नसताना चालवायचे क्लिनिक; खराडी अन् वारजेत बोगस डॉक्टरांचा भांडाफोड