Ashok Kharat Case: खरात, वैद्य ते मौलाना! पुरोगामी महाराष्ट्रातील 53 भोंदूबाबांची यादी…
Ashok Kharat Case अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर अंधश्रद्धेविरोधात जनजागृती वाढली असून अनेक पीडित व्यक्ती पुढे येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून तक्रारी केल्या, तर अनेक प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाल्यानंतर अवघ्या सव्वा दोन महिन्यांत महाराष्ट्रात ५३ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे वाढते जाळे चिंतेचा विषय ठरले आहे. (Ashok Kharat Case)
अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभर अंधश्रद्धेविरोधात जनजागृती वाढली असून अनेक पीडित व्यक्ती पुढे येऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून तक्रारी केल्या, तर अनेक प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. (Ashok Kharat Case)
या ५३ प्रकरणांचा अभ्यास केला असता, विविध धर्मांशी संबंधित भोंदूबाबांविरोधात कारवाई झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा आरोप पुन्हा एकदा खोटा ठरल्याचे अंनिसकडून सांगितले जात आहे. (Ashok Kharat Case)
या घटनांमधून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नागरिकही भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भीती, सामाजिक प्रतिष्ठा आणि बदनामीच्या धास्तीमुळे अनेक पीडित महिला अजूनही पुढे येण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. (Ashok Kharat Case)
मात्र, अशोक खरात प्रकरणानंतर अनेक महिलांना न्यायासाठी लढण्याचे धैर्य मिळाले आहे. त्यामुळे अजूनही अशा फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. (Ashok Kharat Case)

भोंदूबाबा
समाजातील अंधश्रद्धा, फसवणूक आणि अमानुष प्रथा रोखण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्षे संघर्ष केला. या लढ्यानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. (Ashok Kharat Case)
मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन अनेकदा अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. तरीही अंनिस आपल्या मर्यादित साधनसामग्रीतून जनजागृती, प्रबोधन आणि कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने करत आहे. (Ashok Kharat Case)
हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहे. ह्या ५३ दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे:
१) अशोक कुमार खरात , नाशिक
२)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे
५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी,
सोलापूर
६)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे
७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई
८) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई
१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
१३)किसन तळपे मंदोशी, खेड
१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक
१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
१६) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई
१७) अनिल सोलोमन सिंग
( पादरी), पुणे
१८)शिवराम पराश सावर, पालघर
१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर
२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
२२) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा
२३) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक
२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर
२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे
२७) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण
२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
३०) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई
३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड
३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे
३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते,
पश्चिम देवपूर, धुळे
३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
३५) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे
३६) सुधाकर गाडगे, बाळापूर , अकोला
३७) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे
३८) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे
३९) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार
, निजामपूर, साक्री, धुळे
४०) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ
४१) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर
४२) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती
४३) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ
४४)महेश मोहन बाबर, विटा, सांगली
४५) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक
४६)परवेज अब्दुल अजीज मेमन , कोंढवा, पुणे
४७) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर
४८) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर
४९) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज,कन्नड, संभाजीनगर
५०) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.
५१) मौलाना अब्दुल हलिम शेख.
बारामती, पुणे
५२) मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी, सोलापूर
५३)मारोती चंदरराव मोरे,लातूर , ग्रामीण





