Radhakrishna Vikhepatil । Maharashtra Cabinet Expansion । महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडणार आहे. अनेक नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. विखे पाटील यांना नागपूर येथे शपथ घेण्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा परिचय :- नाव – राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील जन्म – 15 जुन 1959 शिक्षण – बी.एस्सी. ॲग्री (कृषी) राजकीय – मार्च 1995 पासुन विधानसभा सदस्य 1997 ते 1999 मंत्री, कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय जुलै 1999 विधानसभा सदस्यपदी निवड ऑक्टोबर 2004 विधानसभा सदस्यपदी निवड 19 फेब्रुवारी 2009 मंत्री, शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री, संभाजीनगर जिल्हा ऑक्टोबर 2009 विधानसभा सदस्यपदी निवड 7 नोव्हेंबर 2009 मंत्री, परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय 19 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014 मंत्री, कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा 19 ऑक्टोबर 2014 विधानसभा सदस्यपदी निवड 10 नोव्हेंबर 2014 काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड 24 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश जून 2019 गृहनिर्माण मंत्री 2019 विधानसभा सदस्यपदी निवड 9 ऑगस्ट 2022 महायुती सरकारमध्ये महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री पदाची शपथ 23 नोव्हेंबर 2024 रोजी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी.