Radhakrishna Vikhe Patil : त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं विधान चर्चेत
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक खर्च आणि डामडौल टाळून साध्या पद्धतीने लग्नसमारंभ करावेत, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील साध्या विवाहांचा संदर्भ देत मिश्कील टिप्पणी केली. (Radhakrishna Vikhe Patil)
शिर्डी मतदारसंघातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणींचा संदर्भ देत त्यांनी विवाह सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन केले. (Radhakrishna Vikhe Patil)
‘लग्न साध्या पद्धतीने करा’ (Radhakrishna Vikhe Patil)
पाऊस कमी आहे. त्यामुळे जो मोठेपणा करता, तो यावर्षी तरी थांबवा. लग्न साध्या पद्धतीने करा, असे विखे पाटील म्हणाले. कोरोना काळात अनेकांचे विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले होते. काही विवाह केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत, तर काही ५० लोकांच्या उपस्थितीत झाले. (Radhakrishna Vikhe Patil)
याच संदर्भात विखे पाटील यांनी, मात्र, त्यांना पोरं झाली नाहीत का? अशी मिश्कील टिप्पणी केली. मोठा खर्च आणि डामडौल केल्याशिवायही विवाह सोहळा पार पडू शकतो, असा मुद्दा त्यांनी यावेळी मांडला. (Radhakrishna Vikhe Patil)
‘आता सामुदायिक विवाहाकडे जाण्याची वेळ’ (Radhakrishna Vikhe Patil)
आता पुन्हा सामुदायिक विवाहाकडे जायची वेळ आली आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की, आता हे सगळे डामडौल बंद करा. परिस्थिती अडचणीची आहे. उत्पन्नाचे साधन काय शिल्लक राहणार? जर पाऊस-पाणीच नाही, तर मोठेपणाचे सोंग आपल्याला मिरवायचे आहे ते कृपया या वर्षी तरी थांबवा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. (Radhakrishna Vikhe Patil)
दूध व्यवसायावरही भाष्य (Radhakrishna Vikhe Patil)
यावेळी विखे पाटील यांनी राज्यातील दूध व्यवसायाबाबतही भाष्य केले. तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध भेसळीला आळा बसल्याचा दावा त्यांनी केला. दूध भेसळ कमी झाल्यामुळे बाजारातील परिस्थितीत बदल झाला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा फायदा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. (Radhakrishna Vikhe Patil)
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी अनावश्यक खर्च टाळण्यासोबतच उपलब्ध साधनसामुग्रीचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. (Radhakrishna Vikhe Patil)
Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन


