महायुतीतील एक मंत्री म्हणतात,”योजनेत २-४ टक्के भ्रष्टाचार चालतो”, तर दुसरे मंत्री म्हणाले,”वाळू उपसा करणारी आपलीच माणसं…”

Radhakrishna Vikhe Patil । महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन महिनाभराचा काळ लोटला आहे. त्यातच मंत्र्यांना त्यांचे खातेवाटप देखील करण्यात आले आहे. खातेवाटपानंतर आता सत्ताधारी नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर येताना दिसून येत आहे. राज्यातील पीक विमा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत भाष्य करताना कोणत्याही योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार होतोच, असे वक्तव्य करुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नवा वाद निर्माण केला होता. हे कमी होते कि काय म्हणून आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू उपसा करण्यावर एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभुर्णी येथील सुमन मल्टिप्लेक्सच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं. सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते.असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने आता सरकारला टीकेला सामोरे जावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
वाळू उपसा करणार आपलेच लोक त्यांना अभय द्या Radhakrishna Vikhe Patil ।
टेंभुर्णी येथे आपल्या भाषणात बोलताना राधाकृष्ण विखेपाटील यांनी,”तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रेशरच्या च्या भरपूर गाड्या चालतात असे सांगत जयकुमार तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल असे सांगितले. मी पालकमंत्री असताना अनेक वेळेला याबाबत तक्रारी व्हायच्या, पण मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते. कारण हे घेऊन जाणारे सगळे आपलेच लोक आहेत, असे सांगत वाळू आणि खडीच्या गाड्यांना अभय द्या ,असे सूचक वक्तव्य भाषणात विखे पाटील यांनी केले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातला असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना अवस्था झाली आहे. अशावेळी विखे पाटील यांचे वक्तव्य भाजपला अडचणीत आणणारे ठरणार आहे.
कोणत्याही योजनेत दोन –पाच टक्के भ्रष्टाचार होतोच Radhakrishna Vikhe Patil ।
तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री मणिकराव कोकाटे यांनी,” एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले आहे. प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही योजनेत दोन – पाच टक्के भ्रष्टाचार होतोच. गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत, असे कोकाटे यांनी म्हटले होते. मात्र, कोणत्याही योजनेत दोन – पाच टक्के भ्रष्टाचार होतोच, या त्यांच्या एका वाक्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटे यांचं हे वक्तव्य म्हणजे भ्रष्टाचाराचं समर्थन आहे. कृषी खात्याच्या एकूण बजेटच्या दोन-चार टक्के ही रक्कम खूप मोठी असते असे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा
विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पुन्हा उतरणार मैदानात; उद्यापासून नाशिक दौऱ्यावर





