रेसकोर्सची जागा मुंबई पालिकेच्या ताब्यात; सेंट्रल पार्क उभारण्यात येणार

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली महालक्ष्मी रेसकोर्सची जागा आता मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकार 211 एकर जागेपैकी 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देणार आहे.
ज्यामुळे आता या जागेवर सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन उभारण्यात येणार आहे. तर यातील 91 एकर जागा टर्फ क्लबला देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच 120 एकर जागेवर मुंबईकरांना उत्सुकता असलेले सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची जागा 99 वर्षांच्या लिझवर देण्यात आली होती. हा 99 वर्षांचा करार 2013 मध्ये संपुष्टात आल्यानंतर या जागेवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती.
पण या रेसकोर्समधील जागा ही मुंबई महापालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. पण गेल्या 10 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. पण आता अखेरीस राज्य सरकारकडून यासाठीची मान्यता देण्यात आली आहे.





