आर माधवनचा सीक्रेट डाएट प्लॅन; तब्बल २१ दिवसांत स्वत:ला केलं फिट

R Madhavan Fitness Secret | बॉलीवूड अभिनेता मॅडी अर्थात आर माधवनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अलीकडेच ‘शैतान’ या चित्रपटातून माधवनने नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु सध्या आर माधवन कोणत्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. आर माधवनच्या फॅट टू फिट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
माधवनने तब्बल २१ दिवसांत स्वत:ला फिट केलं आहे. याबाबत माधवनने पूर्वी ट्विटर आणि आता एक्स वरील त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर सीक्रेट डाएट प्लॅन सांगितला आहे. या पोस्टमध्ये माधवन लिहिले की, “इंटरमिटेंट फास्टिंग, जेवण ४५ ते ६० वेळा चावणे, दिवसातील शेवटचा आहार सात वाजण्याच्या आधी घेणे, सकाळी फिरणे आणि रात्री उत्तम झोप घेणे, झोपण्याच्या ९० मिनीटांपूर्वी स्क्रिन टाईमपासून दूर राहणे, जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन, जास्तीत जास्त हिरव्या भाज्या, आपल्या शरीरासाठी निरोगी आणि चांगले पचन होणारे अन्न जेवणे, याव्यतिरिक्त बाकी काही केलेलं नाही.” R Madhavan Fitness Secret |
Intermittent fasting, heavy chewing of food 45-60 times( drink your food and chew your water) .. last meal at 6.45 pm .( only cooked food -nothing raw AT ALL post 3 pm ) .. early morning long walks and early night deep sleep( no screen time 90 min before bed) … plenty of fluids… https://t.co/CsVL98aGEj
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 18, 2024
त्याने एका प्रसिद्ध युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी शेअर केल्या. त्याचाही व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. यात तो म्हणतो की त्याने कोणताही व्यायाम, रनिंग, औषधे किंवा सर्जनी न करता २१ दिवसांत फॅट टू फिटचा प्रवास यशस्वी केला. शरीराच्या गरजेपुरता आहार घेऊन त्याने वजन घटवल्याने त्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटात माधवन अजय देवगण आणि ज्योतिकासोबत झळकला होता. यानंतर तो ‘टेस्ट’ या तामिळ चित्रपटात झळकणार आहे. R Madhavan Fitness Secret |
हेही वाचा:
भाजप प्रवक्त्यांच्या यादीत उज्ज्वल निकम यांच्या नावाचा समावेश; सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप





