विचारवंतांच्या खुन्याना तातडीने अटक करा

कोल्हापूर :ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, अनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, माजी प्राचार्य एम.एम.कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा. अशी मागणी करत शहिद कॉ.गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने दर महिन्याच्या २० तारखेला शहरातून मॉर्निग वॉक काढला जातो. शुक्रवारी सकाळी बिंदू चौकातून वॉकला प्रारंभ झाला.

प्रकाश हिरेमठ लिखीत ‘कुणी कितीही शिकला पण साधे विज्ञान विसरला’ हे गीत वॉकमध्ये गाण्यात आले. खुशी डवंग हिने मी सवित्री हे नाटक सादर केले. बिंदू चौक, जेल रोड, बालगोपाल तालीम,मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिग, खरी कॉर्नर, पोतणीस बोळ, भवानी मंडप, मार्गे करवीर वाचन मंदिर येऊन बिंदू चौकात समारोप करण्यात आला.

यावेळी कॉ. सतिशचंद्र कांबळे,कॉ. दिलीप पवार, अनिल चव्हाण, रवि जाधव,संभाजी जगदाळे,छाया पोवार,सतिश पाटील,डॉ. विलास पवार,अजय अकोळकर,वसंत पाटील,महादेव शिंगे,दीपक निंबाळकर,सुनील गायकवाड,प्रशांत आंबी, रमेश आपटे, धीरज कटारे, अरुण पाटील, रमेश वडणगेकर, हरिष कांबळे, यश अंबोळे, प्रकाश हिरेमठ आदी हजर होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here