Gramin News : ‘गुणवत्तापूर्वक शिक्षण फक्त गुरूकुल विद्यामंदिर येथेच’ – प्रविण माने

इंदापूर – इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कृष्ट व गुणवत्तापूर्वक शिक्षण प्रसारात नेहमीच अग्रणी असणारी शिक्षण संस्था म्हणजे गोखळी,येथील गुरूकुल विद्यामंदिरचे नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात करण्याचे काम करणाऱ्या गुरुकुल विद्यामंदिर गोखळीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ यांच्यामुळे पोहोचले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.
इंदापूर शहरात सोनाई पॅलेस,येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीणभैया माने यांनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बाळासाहेब हरणावळ गुरुजींना मिळाल्याने हरणावळ यांचा सन्मान माजी सभापती प्रवीण माने यांनी केला. यावेळी समदभाई सय्यद, निलेश रंधवे, छगन बनसुडे,राजेश अवचर, अंकुश दोरकर, प्रविण निगडे, जोतिराम अनपट, संकेत वाघमोडे, आकाश पवार आणि इतर सहकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण माने म्हणाले की, गोखळी सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत आज तब्बल ३००० विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. बरेच विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती, जेईई व नीट परीक्षेत चमकले असून हे बाळासाहेब हरणावळ गुरुजींचे यश आहे. असे गौरवोद्गार माजी सभापती प्रवीण माने यांनी काढले.





