PYC Basketball League : किड्स गटात हिट संघाने पटकावले विजेतेपद…

पुणे – पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत किड्स गटात हिट संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत हिट संघाने सेल्टिक्स संघाचा ७-१ असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले.
हिट संघाकडून रियान करंदीकर (४ गुण), शनाया चाफळकर (३ गुण) यांनी सुरेख कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभुत संघाकडून अनिका आपटेने (१गुण) दिलेली लढत अपुरी ठरली.
Big Bash League 2024 : ब्रिस्बेन हीट ठरला विजेता, Final मध्ये वेगवान गोलंदाज जॉन्सनने केला कहर…
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, सिध्दार्थ भावे, दिपक गाडगीळ, शिरीष साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्णा मेहता, क्षिरिन लिमये आदी उपस्थित होते.

