Manegrow Samspire Tennis Culb C’ship 2024 : पीवायसी ‘अ’ संघाला विजेतेपद…

पुणे :– टेनिसनट्स यांच्या वतीने आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मानेग्रो सॅमस्पायर टेनिसनट्स क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने टेनिसनट्स रॉजर संघाचा १८-१३ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेत अंतिम लढतीत पीवायसी अ संघाने टेनिसनट्स रॉजर संघाचा १८-१३ असा पराभव केला. सामन्यात ९० अधिक गटात पीवायसीच्या प्रशांत गोसावी व ऋतू कुलकर्णी यांनी टेनिस नट्सच्या संदीप बेलुडी व सलील कुंचूर यांचा ६-४ असा पराभव करून संघाचे खाते उघडले.
८० अधिक गटात पीवायसीच्या अनुप मिंडा व रघुनंदन बेनॉय या जोडीने रवी कोठारी व राहुल कोठारी यांचा ६-५ असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. ६० अधिक गटात पीवायसीच्या अभिषेक ताम्हाणेने अनिरुद्ध साठेच्या साथीत टेनिस नट्सच्या जॉय बॅनर्जी व सुनील लुल्ला यांचा ६-४ असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.





