PV Sindhu Final : पी. व्ही. सिंधूचा फ्रान्समध्ये डंका! जपानी वादळाला नमवत फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दाखल; फायनलमध्ये नंबर १ चे आव्हान
PV Sindhu Final : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. विजेतेपदाच्या सामन्यात तिचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियन खेळाडूशी होईल.

PV Sindhu Enters French Open Final Beat Hina Akechi in Semifinal : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या २१ वर्षीय हिना अकेची हिचा २१-१०, २०-२२, २१-१६ अशा तीन गेमच्या मॅरेथॉन लढतीत पराभव केला. १ तास १३ मिनिटे चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवून सिंधूने चालू वर्षात दुसऱ्यांदा सुपर ७५० स्पर्धेची फायनल गाठली. यापूर्वी तिने जुलैमध्ये जपान ओपनचे जेतेपद पटकावले होते. आता विजेतेपदासाठी तिच्यासमोर दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित आन से यंग हिचे कडवे आव्हान असणार आहे.
पहिल्या गेममध्ये सिंधूचे निर्विवाद वर्चस्व –
जागतिक क्रमवारीत २२ व्या क्रमांकावर असलेल्या हिना अकेचीने सुरुवातीला सिंधूला कडवी टक्कर दिली. स्कोअर ४-४ आणि नंतर ८-८ असा बरोबरीत असताना सिंधूने खेळाची गती वाढवत ब्रेकपर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर भारतीय खेळाडूने आक्रमक रूप धारण करत सलग गुण मिळवले. सिंधूने अखेरच्या १२ पैकी तब्बल ११ गुण जिंकत अवघ्या १८ मिनिटांत पहिला गेम २१-१० असा सहज आपल्या नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये अकेचीचा पलटवार; चुरशीची झुंज –
#FrenchOpen2026
PV Sindhu into another Super 750 final! ✅
What a battling win that is. Against a up-and-coming talented lefty in Hina Akechi, I thought Sindhu was in trouble at the backend of the decider as she let go of a 14-9 lead on the back of some superb play by the youngster.
But Sindhu somehow finds some reserve fuel and plays a couple of huge points towards the end, especially at the net. When her power seemed to be going down, she turned to her touch-play and it proves just enough. The winning point, however, was a signature Sindhu winner.
Huge credit to Akechi for producing a fine see-saw contest that was great fun to watch for the most part.
And now, Sindhu – who was drawn to face An Seyoung in the first round here in Paris – will face the Korean win machine in the final on Sunday.
— Vinayakk (@vinayakkm) October 24, 2026
दुसऱ्या गेममध्ये जपानी खेळाडूने जोरदार मुसंडी मारली. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सिंधूने क्रॉस-कोर्ट स्मॅशच्या जोरावर १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर अकेचीने पुन्हा आघाडी घेत गेम पॉइंट मिळवला. सिंधूने दीर्घ रॅलीनंतर २०-२० अशी बरोबरी साधत तो वाचवला खरा, मात्र अखेरच्या क्षणी सिंधूचा शॉट कोर्टबाहेर गेल्याने अकेचीने हा गेम २२-२० ने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये ३८ शॉट्सची ऐतिहासिक रॅली आणि विजय –
STORMING INTO THE FINAL! 💥
PV Sindhu defeats Hina Akechi 21-10, 20-22, 21-16 in a 73-minute semi-final clash at the French Open 2026! 🇮🇳🔥
📸 Show your support in the comments below! 👇 https://t.co/KDbMHN12rf
— BAI Media (@BAI_Media) October 24, 2026
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला. स्कोअर १५-१५ ने बरोबरीत असताना तब्बल ३८ शॉट्सची एक थरारक रॅली झाली. यामध्ये अकेचीने नेटवर चूक केल्याने सिंधूने १८-१६ अशी मोक्याची आघाडी घेतली. यानंतर अनुभवी सिंधूने एकापाठोपाठ एक अप्रतिम नेट शॉट्स आणि भेदक क्रॉस-कोर्ट स्मॅश मारत २१-१६ असा गेम जिंकून शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.





