Putri Andriani : ‘या’ प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचे दुर्दैवी निधन
ज्या दिवशी घरात वाढदिवसाचा केक कापला (Putri Andriani) जाणार होता आणि अभिनंदनाचा वर्षाव होणार होता, त्याच दिवशी एका भयानक बातमीने संपूर्ण जगाला सुन्न करून सोडले.

Putri Andriani : ज्या दिवशी घरात वाढदिवसाचा केक कापला (Putri Andriani) जाणार होता आणि अभिनंदनाचा वर्षाव होणार होता, त्याच दिवशी एका भयानक बातमीने संपूर्ण जगाला सुन्न करून सोडले.
‘मिस अर्थ इंडोनेशिया २०२५’ चा मानाचा मुकुट डोक्यावर चढवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अवघ्या २५ वर्षीय पुत्री आंद्रियानी जुफिचा (Putri Andriani) हिच्या अचानक जाण्याने आंतरराष्ट्रीय सौंदर्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. १४ ऑगस्ट रोजी ती आपला २६ वा वाढदिवस साजरा करणार होती, परंतु आनंदाचा तोच दिवस तिच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी काळा दिवस ठरला.
‘मिस ग्रँड इंडोनेशिया’ संस्थेने १४ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जुफिचाच्या निधनाची धक्कादायक माहिती दिली. तिच्या अचानक झालेल्या एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
संस्थेने आपल्या शोकसंदेशात म्हटले की, जुफिचा (Putri Andriani) ही केवळ एक सौंदर्यवती नव्हती, तर तिची शालीनता, आंतरिक ताकद आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तिने प्रत्येकाचे मन जिंकले होते. सौंदर्य मंचावर ‘नॉर्थ सुलावेसी’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुफिचाने २०२५ च्या ‘मिस ग्रँड इंडोनेशिया’मध्ये उपविजेतेपद पटकावले होते, ज्यानंतर तिची ‘मिस अर्थ इंडोनेशिया’ म्हणून निवड करण्यात आली.
जुफिचाचे आयुष्य केवळ ग्लॅमर आणि कॅमेऱ्यापुरते मर्यादित नव्हते. कायद्याचा अभ्यास करणारी ही हुशार तरुणी एक उत्तम गायिकाही होती. निसर्गाशी तिची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली होती. नद्यांचे प्रदूषण रोखणे, कचऱ्याचे पुनर्वापर करणे आणि स्थानिक लोकांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे यात तिचा कायम पुढाकार असायचा.
सौंदर्य स्पर्धेच्या भव्य मंचाचा वापर तिने (Putri Andriani) पर्यावरणाचा जागर करण्यासाठी केला, ज्याची दखल ‘मिस अर्थ’ संस्थेनेही घेतली होती. निधनाच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी जून महिन्यात तिने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले होते. नेहमी हसतमुख असणाऱ्या या तरुणीचा अशा प्रकारे अकाली आणि गूढ रीतीने अंत झाल्याने जगभरातील फॅशन आणि पर्यावरण प्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.






