Indonesia Ferry Fire : इंडोनेशियामध्ये प्रवाशांच्या जहाजाला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला भीषण आग (Indonesia Ferry Fire) लागल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Indonesia Ferry Fire : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला भीषण आग (Indonesia Ferry Fire) लागल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून समुद्रात वेगाने शोध मोहीम राबवली जात आहे.
इंडोनेशियाच्या शोध व बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आग (Indonesia Ferry Fire) लागली त्यावेळी जहाजात एकूण २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवारी दुपारपर्यंत २२५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित बेपत्ता 41 जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
हे जहाज पूर्व जावा प्रांतातील सुराबाया शहरातून दक्षिण सुलावेसी येथील मकासरकडे जात होते. प्रवासादरम्यान जावाच्या ईशान्य किनारपट्टीवर असलेल्या मदुरा बेटाजवळ जहाजात अचानक आग भडकली.
अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणांनी अनेक जहाजे आणि नौका घटनास्थळी (Indonesia Ferry Fire) तैनात केल्या आहेत. अधिकारी आणि बचाव पथक आसपासच्या सागरी क्षेत्रात बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






