Russia Ukraine War : अमेरिकन एफ-16 फायटर जेट पाडा अन् मिळवा 1.41 कोटींचे बक्षीस….

Russians Offer Bounty for F-16 Downed : रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाविरुद्धच्या या युद्धात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह सर्व नाटो देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत आणि शस्त्रे पुरवत आहेत. या सगळ्यात रशियाने आपल्या सैनिकांना खुली ऑफर दिली आहे. युक्रेनच्या आकाशात उडणाऱ्या अमेरिकन एफ-16 आणि फाल्कन विमानांना जर त्यांनी खाली पाडले तर त्यांना बक्षीस मिळेल, असे रशियन कंपन्यांनी सैनिकांना सांगितले आहे. दरम्यान, प्रदीर्घ काळ युद्धात अडकलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी हे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया पोस्टमध्ये या ऑफरची माहिती दिली. यामध्ये, रशियन तेल कंपनी फॉरेसच्या (Fores) संचालकांनी सांगितले की, जो कोणी F-15, F-16 सारखे पहिले विमान पाडेल, त्या रशियन वैमानिकांना 15 दशलक्ष रूबल म्हणजेच 1.4 कोटी रुपये मिळतील. एवढेच नाही तर नाटोचा रणगाडा उडवणाऱ्याला 5 लाख रुबलचे बक्षीस दिले जाईल असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ही घोषणा एका सन्मान समारंभात करण्यात आली, जिथे युक्रेनमधील अवडिव्हका येथे पाश्चात्य रणगाडे उडवणाऱ्या सैनिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फॉरेसच्या (Fores) सीईओने जूनमध्ये रणगाडे-टँक उडवणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते. आता फॉरेस कंपनीने लढाऊ विमान पाडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. ही घोषणा अशा वेळी केली गेली जेव्हा अलीकडेच डेन्मार्क आणि नेदरलँडच्या सरकारांनी दावा केला होता की, F-16 लढाऊ विमाने युक्रेनला पाठवली जाणार आहेत आहेत आणि या उन्हाळ्यात त्यांची उड्डाणे सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
USA vs Russia : रशिया भारताला फसवू शकतो, वेळ आली तर पुतीन चीनचीच बाजू घेतील – अमेरिका
खरे तर, डेन्मार्क आणि नेदरलँड्सने रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनची ताकद वाढवण्यासाठी 85 जेट विमाने देण्याची घोषणा केली आहे. F-16 विमाने देणे हा या मालिकेचा एक भाग मानला जात आहे. यानंतर आणखी विमाने येणार असल्याचेही युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले होते. नाटो देशांकडून युक्रेनला F-16 विमानांची डिलिव्हरी नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजचा भाग आहे.




