“महात्मा फुलेंचे विचार कृतीतून आचरणात आणा”

नगर -प्रत्येक मनुष्याला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी कर्मकांड समाजाविरोधात लढा उभा करुन न्याय देण्याचे काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून माळीवाडा वेस येथे माळी महासंघ व क्रांतीज्योती बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. तर बाळासाहेब बोराटे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि कार्य सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक राहिले आहे. त्यांची जयंती ही कृतीतून साजरी होणे आवश्यक आहे, त्यासाठी असे समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात गणेश बनकर म्हणाले, माळी महासंघाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.प्रमोद तांबे, कर्मचारी जिल्हा आघाडीचे अध्यक्ष नंदकुमार नेमाणे, माळी महासंघाचे शहर जिल्हाध्यक्ष नितीन डागवाले, माळी महासंघाचे शहर उपाध्यक्ष विवेक फुलसौंदर, कर्मचारी आघाडीचे शहराध्यक्ष राहुल साबळे, कार्याध्यक्ष गणेश धाडगे, राजेंद्र बोरुडे, अशोक कन्हेरकर आदि उपस्थित होते.





