Allu Arjun : घरावर झालेल्या हल्ल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याच्या समोरील अडचणी काही थांबायचे नाव घेईना. एकीकडे त्याचा पुष्पा – २ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला या चित्रपटावरून सुरू झालेला वाद. हा वाद आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला होता. यानंतर आता अल्लू अर्जुनने आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.
रविवारी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी काही आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड केली होती. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (OU-JAC) सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
काय घेतला निर्णय?
या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने मोठा निर्णय घेतला आहे. तो मुलांसह घर सोडून सुरक्षित स्थळी गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने आपल्या मुलांना वडिलांच्या घरी पाठवले आहे.अल्लू अर्जुनने त्याच्या घराबाहेर झालेल्या निषेधांवर अद्याप भाष्य केले नसले, तरी त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.





