Miraj News : मिरजेत खुनाचा कट उधळला; कोयते घेऊन निघालेली टोळी फिल्मी स्टाइलने जाळ्यात
मिरज शहर पोलीसांच्या (Miraj News) सतर्कतेने खुनाचा कट उधळला असून कोयते घेऊन निघालेली टोळी फिल्मी स्टाइलने पोलीसांच्या जाळ्यात अडकली.

Miraj News : मिरज शहर पोलीसांच्या (Miraj News) सतर्कतेने खुनाचा कट उधळला असून कोयते घेऊन निघालेली टोळी फिल्मी स्टाइलने पोलीसांच्या जाळ्यात अडकली. शहरात मंगळवारी झालेल्या शिव अथनीकरवरील खुनी हल्ल्यानंतर शहरात तणावाच्या वातावरणात दोन टोळ्यांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता लक्षात घेत मिरज शहर पोलिसांनी गस्त वाढवली होती.
ब्राह्मणपुरी परिसरात कोयते घेऊन सहा जणांची टोळी प्रतिस्पर्ध्यांवर हल्ल्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिरज (Miraj News) शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना बुधवारी रात्री आठ वाजता मिळाली. चौगले यांनी तातडीने ब्राह्मणपुरी येथे सापळा रचला.
मोटरसायकलवरून शस्त्रे घेऊन जाणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी पाठलाग केला आणि गोविंद नाईक (वय २६, दिंडीवेस), रिहान शिकलगार (वय ३०, सतारमेकर गल्ली), राजू मुल्ला (वय २५, दत्त कॉलनी), अनिश सौदागर (वय २९, सुभाषनगर), अल्फाज मुल्ला (वय २४, अमननगर) या पाच जणांना ताब्यात घेतले.
तसेच पोलिसांनी एक दुचाकी, दोन कोयते आणि एक लोखंडी रॉड जप्त केला. मतीन काझी टोळीवर हल्ला (Miraj News) करण्याच्या उद्देशाने हे सर्व संशयित निघाले होते. मिरज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. सहाव्या संशयिताचा शोध सुरु आहे.






