Pushpa 2 : डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ‘दंगल’ नंतर, ‘पुष्पा २’ हा हिंदी चित्रपटसृष्टीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असल्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आता तुम्ही हा मोठा चित्रपट घरी टीव्हीवर पाहू शकाल. अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा २’मध्ये रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील अल्लू अर्जुनची ज्वलंत शैली, त्याचा अभिनय आणि अक्शन यांनी लोकांची मने जिंकली. आता हे सर्व टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही हा चित्रपट कधी आणि कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकाल हे आम्ही सांगणार आहोत. ‘पुष्पा २’ १३ एप्रिल रोजी टीव्हीवर तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तुम्हाला संध्याकाळी ५:३० वाजता ‘स्टार माँ’ वाहिनीवर तेलुगू भाषेत पाहता येईल. हा चित्रपट मल्याळम भाषेत एशियानेट वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता दाखवला जाईल. कन्नड भाषेतील या चित्रपटाचा प्रीमियर संध्याकाळी ७ वाजता कलर्स कन्नडवर होईल. या तीन भाषांव्यतिरिक्त, हा चित्रपट १४ एप्रिल रोजी विजय या टीव्ही चॅनलवर तमिळ भाषेत दाखवला जाईल. जर तुम्ही हा चित्रपट हिंदी भाषेत पाहण्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला थोडी जास्त वाट पहावी लागेल, कारण हिंदी आवृत्तीच्या प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची कमाई ‘पुष्पा २’ ने लोकांची मने जिंकण्यासोबतच बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. निर्मात्यांच्या मते, या चित्रपटाने जगभरात १८७१ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आहे. तुम्ही हा चित्रपट तिथे देखील पाहू शकाल. दरम्यान, ‘पुष्पा २’ नंतर, चाहते त्याच्या तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत, जो आपल्याला येत्या काही वर्षांत पाहायला मिळेल.