Pushkar Jog : पुष्कर जोगच्या चित्रपटाचे युकेमध्ये शुटींग सुरू; ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन
Pushkar Jog : 'अंतराल' असं या चित्रपटाचे नाव

Pushkar Jog : अभिनेता पुष्कर जोगने यूकेमध्ये नव्या फिल्मचं शूटिंग सुरू केलं आहे. त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘अंतराल’ असं या चित्रपटाचे नाव आहे. पुष्करने इन्स्टाग्रामवर सेटवरील क्लॅपबोर्डची एक झलक शेअर करून ह्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीची घोषणा केली.
याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पुष्कर म्हणाला, “माझ्या पुढील हिंदी हॉरर रोमँटिक ड्रामा चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंद होत असून या सिनेमाचं शूटिंग युकेमध्ये होतं आहे. हा एक ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपट आहे.’ हा एक हिंदी हॉरर, रोमँटिक, ड्रामा फिल्म असून, ज्यात प्रेम आणि धोका यांचा समावेश आहे. या चित्रपटात पुष्कर जोगसोबत अनिसा बट दिसणार आहे. पुष्कर जोगसोबत झळकणारी अभिनेत्री अनिसानं यापूर्वी ‘ये जवानी है दिवानी’ सारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
‘अंतराल’ चित्रपटाची निर्मिती ‘गुसबम्प्स एंटरटेनमेंट’ने केली असून सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते तेजा सलादी यांनी केलं आहे. निखिल रानडे यांनी छायांकन केलं आहे.
View this post on Instagram
पुष्कर पुढे म्हणाला की, “युनायटेड किंगडममध्ये शूटिंग केल्यामुळे चित्रपटाला एक पूर्णपणे वेगळा व्हिज्युअल प्राप्त झालं आहे. तेजा सलादी यांच्यासोबत काम करणं हा एक समृद्ध करणारा अनुभव होता, कारण ते कथाकथनामध्ये एक वेगळी दृष्टी आणि स्पष्टता आणतात. अनिसा बटसोबत काम करण्याचा अनुभवही खूप चांगला होता.
मला विश्वास आहे की, आमची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. एक अभिनेता म्हणून, मी नेहमी अशा भूमिकांच्या शोधात असतो ज्या मला आव्हान देतात आणि माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची संधी देतात आणि ‘अंतराल’ सिनेमा नेमकं तेच करतो.”
दरम्यान, पुष्कर जोग हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 2007 मध्ये आलेल्या ‘जबरदस्त’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. ‘ईएमआय’, ‘जाना पेहचाना’ अशा हिंदी फिल्ममध्येही त्याने काम केलं आहे. 2018 मध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचा तो उपविजेता आहे. Pushkar Jog
हेही वाचा:
Solapur : 74 मिनिटे स्टेशनवर थांबली ट्रेन अन् घडला थरार! यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा





