प्रभात वृत्तसेवा वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील उपसरपंचपदी सागर मदन भुजबळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी भुजबळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल हिरासकर यांनी त्यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली.ग्रामपंचायतीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाली होती. सरपंच म्हणून अतुल गायकवाड तर उपसरपंचपदी अमित पवार यांचीही बिनविरोध निवड झाली होती. पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदी साम्राज्ञी लंबाते यांचीही बिनविरोध निवड झाली होती. लंबाते यांनी निर्धारित वेळेत राजीनामा दिल्यानंतर सरपंच गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील सोमवार (दि.२४) निवडणूक घेण्यात आली.यावेळी सागर मदन भुजबळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल हिरासकर यांनी भुजबळ यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली. यावेळी माजी उपसरपंच साम्राज्ञी लंभाते, अमित पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार, तेजस दुर्गाडे, हरी दुबळे, कविता पवार, प्रमिला पवार, मयुरी भुजबळ, पूर्वा राऊत, शीतल मदने आदी उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच अतुल गायकवाड व ग्रामस्थ सदस्य यांच्या हस्ते सागर भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सागर भुजबळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सचिन लंबाते, गिरीश पवार, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, आडाचीवाडी सरपंच सुवर्णा पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.