Purandar Airport Project | पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद ; ७२% क्षेत्राची संमती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वत:हून पुढे येत आहेत. मागील 19 दिवसांत सात गावांमधील 1 हजार 980 शेतकऱ्यांनी सुमारे 2 हजार 30 एकर क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासनाकडे संमतिपत्रे दिली आहे. एकूण क्षेत्राचा विचार करता तब्बल 72 टक्के क्षेत्राची संमती मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन होणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात होऊन हे क्षेत्र १ हजार २८५ हेक्टर करण्यात आले आहे. भूसंपादनासाठी दि. 25 ऑगस्ट 2025 पासून संमतिपत्र स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशी तब्बल 760 शेतकऱ्यांनी सुमारे 1 हजार 70 एकर क्षेत्रासाठी संमतिपत्रे दिली. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होऊन आतापर्यंत 72 टक्के शेतकऱ्यांनी विमानतळासाठी संमतिपत्रे सुपूर्त केली आहे. ज्या जागा मालकांनी संमतिपत्रे सादर केली आहेत, त्या जागा मालकांचा परतावा निश्चित झाला आहे. विमानतळासाठी संमती देण्यासाठी दि. १८ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
भूसंपादन स्थिती..
-एकूण संपादन क्षेत्र – सुमारे तीन हजार एकर
-संमतिपत्रे मिळालेले क्षेत्र – सुमारे 2 हजार 30 एकर





