Punjab Election Result 2022 : नवज्योतसिंग सिद्धू यांना धक्का; जाणून घ्या ‘राजकीय गुरु’ची अवस्था?

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणीस सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राजकीय गुरु सिद्धू हेच तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे हा त्यांचासाठी मोठा धक्का आहे. तर दुसरी कडे कॅप्टन अमरिंदर सिंग सुद्धा पिछाडीवर आहे.
नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. येथे आम आदमी पक्षाचे उमेदवार त्यांना स्पर्धा देत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग सुद्धा पिछाडीवर आहेत. तथापि, ही मतमोजणीची सुरुवातीची फेरी आहे. सध्या मतमोजणी सातत्याने सुरू आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. सर्वांचे लक्ष अंतीम निकालाकडे लागून आहे.





