Pune News : ‘द व्हाय कोड’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन संपन्न
पुण्यातील सिंहगडावर संतोष सुरपुरे यांच्या ‘द व्हाय कोड’ या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजगोपाल मिनीयर (फायनान्स कमिटी मेंबर, श्री राम मंदिर अयोध्या तीर्थ क्षेत्र), अमोल शिंगाटे (डायरेक्टर, सुप्रीम फैसिलिटी) आणि संशोधक डॉ. नंदकिशोर मते यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तसेच रो कुशल करेवार हेही उपस्थित होते.

पुणे : पुण्यातील सिंहगडावर संतोष सुरपुरे यांच्या ‘द व्हाय कोड’ या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजगोपाल मिनीयर (फायनान्स कमिटी मेंबर, श्री राम मंदिर अयोध्या तीर्थ क्षेत्र), अमोल शिंगाटे (डायरेक्टर, सुप्रीम फैसिलिटी) आणि संशोधक डॉ. नंदकिशोर मते यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तसेच रो कुशल करेवार हेही उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना एका प्रमुख पाहुण्याने सांगितले की, “आजच्या धावपळीच्या युगात सुख आणि आनंद यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलिशान गाडीत बसल्याने सुख मिळू शकते, पण आनंद मिळतो का हे तपासणे आवश्यक आहे. संतोष सुरपुरे यांनी या पुस्तकात पूर्ण अभ्यासपूर्वक जीवनातील ५ महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकून आनंदी जीवन कसे जगता येईल हे सांगितले आहे.
”लेखक संतोष सुरपुरे यांनी आपल्या भाषणात म्हटले, “आपण जे काही करत असतो, त्यामागे योग्य उद्दिष्ट नसेल तर ती गोष्ट साध्य झाली तरीही आपण नैराश्यपूर्ण जीवन जगतो. म्हणून प्रत्येक काम हे उद्दिष्टपूर्वक असणे गरजेचे आहे.”कार्यक्रमाची सांगता रो. अतुल कारले यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत केली.
त्यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करत विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे पुस्तक जगभरातील वाचकांनी घेऊन वाचावे, असे आवाहन केले. तसेच सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांचे आभार मानून कार्यक्रम समाप्त केला.हा कार्यक्रम जीवनातील आनंद आणि उद्दिष्ट यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा प्रेरणादायी ठरला. ‘द व्हाय कोड’ हे पुस्तक वाचकांना सुखापेक्षा आनंदी राहण्याचा मार्ग दाखवणारे ठरेल, अशी अपेक्षा आहे.






