Pune ZP Election : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक विकास निधी आणणार; काटी-लाखेवाडी गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले यांचा संकल्प
Pune ZP Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत ढोलेंचा सर्वाधिक निधी आणण्याचा संकल्प.

Pune ZP Election – काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीमंत ढोले यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील कालावधीत कामकरताना, जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघासाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक विकासनिधी आणण्याचा ठाम संकल्प श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला. झोपडीतला माणूस हा केंद्रबिंदू मानून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचे राजकारण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या मतदारसंघातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर विशेष भर देताना श्रीमंत ढोले म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित कोणतीही अडचण असो, ती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून सोडवली जाईल. शेतकर्यांना अर्थपुरवठ्याच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी निरा-भिमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या बाजूने उभे असल्याचे सांगत, उस गाळपाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. त्यामुळे शेतकरी, कामगार, व्यापारी, युवक-युवती अशा कोणत्याही घटकाने चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लाभल्याने जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणणारा, सर्वांगीण विकास साधणारा आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तयार असल्याचेही श्रीमंत ढोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काटी-वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी जय भवानी गड प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात अद्यावत शिक्षण प्रणाली उभारण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत मतदारांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसून,
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच विकास, शेतकरी हित, शिक्षण आणि सक्षम नेतृत्व या चारही आघाड्यांवर ठोस भूमिका मांडणार्या श्रीमंत ढोले यांना मिळणारा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकीत काटी-लाखेवाडी मतदारसंघाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकणार असल्याचे चित्र स्पष्ट करीत आहे.






