पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र बुधवारी बंद राहणार आहेत. सलग दुसऱ्या दिवशी लस नसल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीचे डोस शिल्लक नसल्याने केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. बुधवारी लसीचा पुरवठा झाला तर गुरूवारी लसीकरण केंद्र सुरू ठेवता येतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून कोविशील्ड लसींच्या डोसचे वितरण विस्कळीत झाले आहे.