Big Breaking : पुण्यात उद्यापासून सर्व दुकाने उघडणार; वाचा नवी नियमावली…
Updated On:

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) राज्यातील जनतेशी संवाद साधताना १० टक्क्यांपेक्षा कमी संसर्गदर असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येऊ शकतात असे संकेत दिले होते. यानंतर आज पुणे महापालिकेने शहरातील निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महापालिकेच्या आदेशातील महत्वाचे मुद्दे
- आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील.
- महापालिका क्षेत्रातील सर्व बँक कामाच्या दिवशी सुरु राहतील.
- आवश्यक सेवांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहणार
- रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी (मागील आदेशाप्रमाणे)
- दुपारी ३ नंतर नागरिकांना अत्यावश्यक कारण अथवा अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडण्यास मनाई.
- हा निर्णय पुढील दहा दिवसांसाठी घेण्यात आला असून त्यानंतर पुन्हा आढावा घेण्यात येईल.
टॅग्स:





