पुणे : टँकरच्या धडकेत दोन बहिणींचा मृत्यू, कॅम्प मधील घटना
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) : भरधाव टँकर ने दुचाकीस धडक दिली. त्यामध्ये एक वर्षाच्या चिमुरडीसह दोन बहिणींचा मृत्यु झाला. कॅम्प परिसरात रेसेडेन्सी क्लब समोर आयबी चौक येथे रविवारी रात्री ही घटना घडली.
रेहनाज रिझवान शेख (वय १६ रा. विमान नगर) आणि तिची मामे बहीण उमेहनी सुहेल शेख (वय १ वर्ष रा. सरबतवाला चौक, दस्तुर मेहेर रोड, कॅम्प) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघींची नावे आहेत. या प्रकरणी रुकसार रिझवान शेख (वय २४ रा. विमान नगर) यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात टँकरचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




