Pune Traffic: पुणे पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नगर रोडने घेतला मोकळा श्वास

Pune Traffic: पुणे-नगर रोडवरील खराडी ते वाघोलीपर्यंत वाहतूक कोंडी मुक्तीसाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नगर रोडने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रु व मार्च महिन्यातील कॉरीडोर मधला वेग हा १६ ते १९ टक्क्याने वाढला असून वाहतूक शाखेकडुन केलेल्या सुधारणा व कारवाईमुळे परिस्थिती बदलत आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पुढाकारातुन नगर रोडवरील येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयुक्तांसह पुणे शहर परिसरातील लोकप्रतिनिधी, यांनी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती आणि योग्य त्या उपाययोजना वाहतुक शाखेकडून करण्याबाबत सुचना केल्या होत्या.
रंजनकुमार शर्मा, (सह पोलीस आयुका, पुणे शहर), मनोज पाटील, (अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेकडून नगर रस्त्यावरील वाहतुक समस्यांचा अभ्यास करुन, वाहतुक कोंडी कमी करुन वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, काही राईट टर्न व यु टर्न बदल करण्यात आले आहेत.





