Pune News : अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल
Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवार (१५ नोव्हेंबर) आणि सोमवार (१६ नोव्हेंबर) या दोन्ही दिवशी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (१५ नोव्हेंबर) आणि सोमवारी (१६ नोव्हेंबर) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. ‘सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन वाहतूक शाखेेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. (Pune News)
‘लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune News)
कोरेगाव पार्क येथील नाॅर्थ मेन रोड, जहाँगीर हाॅस्पिटल चौक, अभियांत्रीकी महाविद्यालय चौक, नेहरु मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली. (Pune News)
सोमवारी (१६ नोव्हेंबर) अमित शहा यांचा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने कार्यक्रम संपेपर्यंत सोमवारी सकाळी नऊनंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हाॅटेल, पेरुगेट पोलीस चैाकी ते पावन मारुती मंदिर, भरत नाट्य मंदिर परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune News)
सोमवारी सकाळी सातनंतर किराड चौक ते नेहरु मेमोरिअल हाॅल चौक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हाॅटेल ब्ल्यू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. (Pune News)
पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी माॅल ते हाॅटेल ब्ल्यू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस माॅल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्काॅन मंदिर, ब्ल्यू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेे आहे. (Pune News)





