पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवात रविवारी (19 सप्टेंबर) रसिकांना दमदार संगीताची पर्वणी अनुभवता येणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाची रविवारी (दि.19) सांगता होणार आहे.
गणेशोत्सवात पार पडलेल्या या महोत्सवात कीर्तन, शास्त्रीय संगीत, बॉलीवूड संगीत, वादन, कवितांच्या मैफीलींचा रसिकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून आनंद घेतला. रविवारी या कार्यक्रमात जावेद अली लाइव्ह अनुभवता येणार आहेत. रसिकांसाठी गाण्यांची ही मेजवानी ठरणार आहे.
“कुन फाया कुन’ ते “सूर निरागस हो’ अशी हिंदी मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गीते ऐकता येणार आहे. जावेद अली आणि त्यांचे सहकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर, ट्रस्टच्या www.bhaurangari.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.