पुणे – सोमवारी (24 जुलै) खडकवासला धरण 82% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.