Pune: उद्योग व व्यापार क्षेत्रातही महिलांची कामे उल्लेखनीय

पुणे : सहनशिलता आणि लवचिकता या दोन शक्तींच्या जोरावर महिलांनी वेगवेगळया क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. उद्योग व व्यावसाय क्षेत्रातही त्या समर्थपणे उभे असल्याचा आनंद होत असल्याच्या भावना भारती विद्यापीठाच्या संचालक अनिता मोहीते यांनी व्यक्त केल्या.
क़ाॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सामाजिक समर्पण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महिला दिनाच्या पूर्व संध्येला सहकारनगर येथील पंडित भिमसेन जोशी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या २३ महिलांंना सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थी महिलांना गौरविण्यात आले.संं घटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख सचिन निवंगुणे, पुणे अध्यक्ष विकास मुंदडा, महिला समंन्वयक गितांजली पांढरे २३ महिनांना सन्मानित करण्यात आला. यावेळी व्यावसायिक क्षेत्रातील सुमारे दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.





