pune : गणेशोत्सवाच्या तोंडावर मिठाईचा गोडवा फिका
pune :

मिठाई दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ, एफडीएच्या कारवाईचा धस्का
pune : गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या तरी सामान्यांसाठीची मिठाई कडू लागण्याची शक्यता आहे. मिठाईसाठी दूध, तूप, साखर, मैदा, बेसन, सुकामेवा आणि एलपीजी सिलेंडरच्या किमती वेगाने वाढला. त्याचा परिणाम मिठाई दरांवर झाला आहे. सणासुदीला मागणी असणाऱ्या मिठाई दरात यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली,
असे वाढले दर pune :
गेल्या काही दिवसात दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची, तर तुपाच्या दरात प्रतिकिलो ५० ते ८० रुपयांची वाढ झाली. सुकामेव्याच्या किमती १५ ते २५ टक्क्यांनी, बेसन आणि मैद्याच्या पोत्यामागे ३०० ते ५०० रुपयांची, तर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे.
गणेशोत्सवात नागरिक प्रसाद म्हणून देण्यासाठी पेढे, मोदक, बर्फी, आंबा मोदक आदींची खरेदी करतात. अनेक जण हौस म्हणून इतरही मिठायांचा आस्वाद घेतत आता साध्या पेढ्यांचे दर ५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सामान्यांच्या आवाक्यातील जिलेबीसाठीही ६०० ते ६८० रुपये मोजावे लागत आहेत.
एफडीएच्या कारवाईमुळे परिणाम
गेल्या काही दिवसात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीविरोधात कारवाई केली आहे आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनावट मावा, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधातील कारवाई वाढली आहे. अनेक व्यावसायिकांकडून किमती कमी ठेवण्यासाठी बनावट माव्याचा वापर करतात. यामुळे एफडीएच्या कारवाईचा परिणातरीहीम किमतीवर दिसत आहे.
मिठाईचे अंदाजित दर (रुपये प्रतिकिलो)
मिठाई —- पूर्वीचा दर सध्याचा अंदाजित दर
साधे पेढे —– ४०० ते ४४० ४८० ते ५२०
मावा मोदक।पेढे ४८० ते ५२० ५६० ते ६४०
जिलेबी ४०० ते ४४० ६०० ते ६८०
काजू कतली ९०० ते ९५० १०५० ते ११५०
लाडू ३६० ते ४०० ४२० ते ४८०
तरीही मागणी कायम pune :
मिठाईचे दर वाढले तरी गणेशोत्सवामुळे मागणीवर फारसा परिणाम होणार नाही, असे मिठाई व्यावसायिक मत व्यक्त करत आहेत. व्यावसायिकांच्या मते वाढत्या महागाईतही नागरिक सणाचा उत्साह कायम असल्याने बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक, लाडू आणि पेढ्यांना मोठी मागणी राहील





