Pune : वन संरक्षणाचा अधिकार आदिवासी विभागाकडेच

पुणे – वनवासींनी नेहमीच वनांचे संरक्षण केले असून भविष्यातही वनांचे संरक्षण करण्याचा अधिकार आदिवासी विभागाकडेच राहील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी दिली.
वन विभाग आणि वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून वन संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपजीविका’ या कार्यशाळेच्या समारोपावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, वनवासी कल्याण आश्रमाचे संजय कुलकर्णी, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, जिल्हास्तरावर जशी कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना तशीच वनविज्ञान केंद्राची स्थापन व्हावी. कुलकर्णी यांनी वनांचल विज्ञान केंद्राची आवश्यकता व्यक्त केली. प्रा. सागर विद्वांस यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. राहुल मुणगीकर यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला आणि प्रा. तुषार देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.





