PUNE : मानाच्या गणपतींचे विसर्जन यंदाही हौदातच
Updated On:

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत गेल्या काही वर्षांपासून मानाच्या आणि शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे कृत्रिम हौदातच गणेशमूर्ती विसर्जन करत आहेत. यंदादेखील ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या विसर्जनासाठी महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून पतंगा विसर्जन घाट आणि पांचाळेश्वर मंदिर गणपती विसर्जन घाट येथे हे हौद उभारण्यात आले आहेत. या हौदांच्या ठिकाणी रांगोळ्या तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत आहे.
मानाच्या गणपतींचे विसर्जन घाट
पतंगा विसर्जन घाट
- कसबा गणपती
- तांबडी जोगेश्वरी गणपती
- गुरुजी तालीम गणपती
पांचाळेश्वर मंदिर घाट
- तुळशीबाग गणपती
- केसरीवाडा गणपती
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- शारदा गजानन, मंडई





