Pune : नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Updated On:


पुणे –कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या नळस्टॉप चौकातील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला.

येत्या 15 दिवसांत उड्डाणपूल पूर्णत्वास जात असून 23 फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे येऊ शकणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी खुला होऊन कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मोकळा श्‍वास घेणार आहे. महापौरांसह महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, मेट्रो तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना 2017-18 अंदाजपत्रकात य हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच वेळी वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्‍वभूमीवर ही संकल्पना मोहोळ यांनी मांडली होती.

असा आहे पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल!

पुलाची एकूण लांबी 550 मीटर

पुलावरून 4 पदरी वाहतूक होणार

पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो

मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

नळस्टॉप परिसरात दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे तातडीने उड्डाणपूल आवश्‍यक होता. संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस जात असल्याचे समाधान आहे. हा उड्डाणपूल मेट्रो प्रशासनाकडून महापालिकेच्या ताब्यात आल्यावर विलंबाशिवाय वाहतुकीसाठी खुला होईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

आणखी संबंधित बातम्या

अग्रलेख : बहनोंकी गुंज

2026-08-24 06:00:08

अग्रलेख : बहनोंकी गुंज

Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; आंदोलनाचा परिणाम अन् प्रवाशांचे हाल

2026-08-23 13:22:07

Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; आंदोलनाचा परिणाम अन् प्रवाशांचे हाल

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

2026-08-23 08:01:35

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

2026-08-23 07:33:51

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार