पुणे | दिपावलीच्या निमित्ताने कोविड योध्यांचा विशेष सन्मान

पुणे (प्रतिनिधी) – करोना संकटाच्या काळात पुणेकरांच्या आरोग्यासाठी जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या कोविड योध्दांच्या दिपावलीच्या निमित्ताने विशेष सन्मान करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज सुतार शशिकांत सुतार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
गेल्या 15 वर्षांपासून समाजातील विविध सेवाव्रतींचा सन्मान या उपक्रमाद्वारे केला जातो. या कार्यक्रमात कोथरूड पोलीस स्टेशन, अलंकार पोलीस स्टेशन, विशेष शाखा परिमंडळ क्र.(3) पुणे शहर कार्यालय व कोथरूड वाहतुक विभाग पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना करण्यात आले.
या प्रसंगी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) बाळासाहेब बडे,अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभाताई जोशी,कोथरूड वाहतुक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, विशेष शाखा परिमंडळ क्र.(3 ) पुणे शहर कार्यालय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे विशेष शाखा परिमंडळ क्र.(3) पुणे शहर कार्यालय पोलीस उपनिरीक्षक आर.एस.किरवे हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
शिवराज सुतार,धर्मराज सुतार,सुधीर वरघडे, हेमंत मोहोळ,सुमित माथवड,संजय डाळिंबकर,शशी नाकते,शरद डहाळे,नचिकेत घुमटकर,सुरज अवधूत,सुंदर खुडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीनेही पालिकेच्या आरोग्य विभाग,कीटक विभाग, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, उद्यान, भवन, गवनी, श्वानपथक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन संकटामध्ये या सर्व विविध विभागांच्या कोविड योध्यांनी आपले सेवा-कार्य बजावून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडले, त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वासांठी दिवाळी फराळ कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना विभागप्रमुख-भारत सुतार व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) चे अध्यक्ष-सुमित माथवड उपस्थित होते.





