पुणे जिल्हा | पुणे – सोलापूर महामार्ग जागोजागी खचला

सोरतापवाडी, (वार्ताहर)- कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचनपर्यंत पुणे-सोलापूर महामार्ग जागी खचला आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णपणे या महामार्गाकडे दुर्लक्ष झाले असून या खचलेल्या महामार्गावर अनेक छोटे मोठे अपघात झात्याने अनेक जण जायबंदी झाले आहेत.
पुणे -सोलापूर महामार्गावर 10 मार्च 2019 रोजी कवडीपाट टोलनाका व कासुर्डी टोलनाका मुदत संपल्यावर बंद झाला. पण आता रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून, वाहन चालकांना याचा त्रास होत आहे. राज्य सरकारने कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी फाटा हा रस्ता बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत (कासुर्डी फाटा) या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दिले होते.
27 किलोमीटरच्या कामासाठी त्यावेळी 88 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण करून सन 2004पासून टोल वसुलीचे काम सुरू केले होते. 15वर्षे टोल वसुली करण्याची परवानगी शासनाने दिली होती. त्यानुसार कंपनी कवडीपाट (ता. हवेली) व कासुर्डी (ता. दौंड) या दोन टोलनाक्यावर वसूली करत होती. टोलवसुलीची मुदत 10 मार्च 2019 रोजी संपली त्यानंतर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे टोलनाका चालू होता ते चांगले होते असा सुर नागरिकांनमधून येत आहे.
लवकरच कवडीपाट ते कासुडी पर्यंत महामार्गाची पाहणी करुन योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील तसेच महामार्गावर पाणी साचत असलेल्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी चेंबरचा उपयोग करण्यात येईल.
-रोहन जगताप, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे पुणे-सोलापूर महामार्ग – येथे जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत.





